🔗21 दिवसांच्या लॉक डाऊन मध्ये काय करायचे🔗
🙏नमस्कार माझ्या उद्योजक मित्रांनो 🙏
काही लोक म्हणत असतील की हा 21 दिवसांचा लॉक डाऊन मध्ये घरात बसून काय करायचे . खूप बोअर होतेय ,काही म्हणतील खा, प्या मजा करा 😊. परंतु मित्रांनो हे 21 दिवस ही फार मोठी संधी आहे आपल्या व्यवसाया संबंधी शिकण्यासाठी .मी आपल्या व्यवसाया साठी महत्वाच्या असणाऱ्या काही स्किल खाली देत आहे हे स्किल शिकणे खूप महत्त्वाचे आहे . मी आजपर्यंत उद्योजकांना गेल्या 10 वर्षात जवळपास 1000 लेक्चर दिले आहे . आणि ह्या लेक्चर मध्ये मी प्रकर्षाने एक गोष्ट सांगतो की आपण फार लकी आहोत की आपल्याला इंटरनेट फार कमी पैसे देऊन उपलब्ध आहे . यु ट्यूब आणि फेसबुकवर फार काही उपलब्ध आहे पण आपण त्याचा उपयोग वेगवेगळे स्किल शिकण्यासाठी न करता टाइम पास साठी करतो . मी तर म्हणेल की यु ट्यूब हे आपल्या सर्वांना वरदान आहे ,खुप काही शिकण्यासाठी .दुसरी महत्वाची गुड नुज सर्वांसाठी आहे ती म्हणजे all skills are learnable. जशी आपण लहान पनी सायकल ,मोटार सायकल ,कार चालवायला शिकलो तसेच हे स्किल पण आपण शिकू शकतो . फक्त यु ट्यूबवर काय सर्च करतो आहे ते महत्त्वाचे आहे .तर खालील काही स्किल उद्योजकांना शिकणे व माहीत असणे फार महत्वाचे आहे .
👉 बिझनेस नेटवर्किंग – आपलं व्यवसाय उद्योगाचे जितके जास्त नेटवर्किंग कराल तितका जास्त तुमचा व्यवसाय मोठा होइल . अनेक संधी त्यातुन मिळतील.
👉 टीम बिल्डिंग : लक्ष्यात ठेवा उद्योजकांचे काम आहे लोकांकडून काम करून घेणे . टाटा ,अंबानी , अडाणी यांचे अनेक व्यवसाय ,अनेक कंपन्या आहे .ते सर्व कसे मॅनेज करतात ,कारण त्यांनी टीम बिल्ड केली आहे . आणि आपल्या समोर तर टीम बिल्डिंग चे जागते उदाहरण म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराज🚩 . तलवारीने बोट कापून स्वराज्याची शपथ घेताना किती मावळे होते सोबत ???? याला म्हणतात शून्या तुन सुरवात करणे. सोबत असणाऱ्या ,आसपास उपलब्ध असणाऱ्या सावंगड्या न मधील स्किल ओळखले आणि त्यांना त्यात ट्रेन केले .
👉 तुमच्या व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग – मित्रांनो येणाऱ्या शतकात ज्याचा व्यवसाय डिजिटल नाही तो व्यवसायात टिकणार नाही . ह्या वर्क फ्रॉम होम च्या घोषणेमुळे फार मोठे बदल येणाऱ्या काळात अपेक्षित आहे . तर तुमच्या व्यवसायाचा डिजिटल प्रेझन्स फार महत्वाचा आहे . व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग पण फार महत्त्वाचे आहे .
👉टाइम मॅनेजमेंट -सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे तुमच्या वेळेचे मॅनेजमेंट . तुमचा मिनिट आणि मिनिट फार महत्वाचा आहे . तुमच्या दिवसभरातील वेळेचा काही भाग हा तुमच्या व्यवसायातील नवीन बदलांवर अभ्यास करण्यासाठी द्यावा लागेल .
👉 पैशाची बचत आणि गुंतवणूक – पैसे कसे वाचवायचे आणि त्याची गुंतवणूक कशी करायची हे ज्याला समजले तो करोडपती झालाच समजा . पैसा तुमच्या साठी जेव्हा काम करेल तेव्हा तुम्ही खरं स्वतंत्र ( financial freedam ) मिळवलं .
👉 व्यवसायाचे ब्रँड बिल्डिंग- मित्रांनो ब्रँड ला फार महत्व आहे . याचे साधे उदाहरण आपण रोज बघतो पण त्यातुन शिकत काही नाही . आपल्या घरात येणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू जसे की तेल , ब्रँडेड साखर , बिसलेरी बॉटल, जॅम , टोमॅटो सॉस ।।। जरा त्याचे पॅकेट वर असणारी माहिती जरा वाचा कोणता ब्रँड ते विकत आहे आणि त्या ब्रँड साठी कोण ते बनवत आहे . किसान ब्रँड चा टोमॅटो सॉस हा ब्रॅण्ड Hindustan Unilever चा आहे पण आपली ओझर जवळची सह्याद्री ऍग्रो प्रोड्युसर कंपनी ही तो सॉस बनवते . तसेच पतंजली बरेच प्रॉडक्ट बाहेरून बनवून घेते व आपल्या ब्रँड खाली विकते. तर ब्रँड ला किती महत्व आहे हे आता समजले असेलच तुम्हाला .
मित्रांनो ह्या 21 दिवसाच्या लॉक डाऊन मध्ये वरील स्किल फुकटात तुम्ही शिकू शकता . जा युट्युबवर आणि सर्च करा ……सर्च करताना जे स्किल शिकायचे आहे त्याचा आधी how लावा जसे की …..
👉How to build a team in business
👉how to do digital marketing of business
👉 how to build business barnd
👉 Time management tips
👉 how to do business networking …
आणि सर्वात मोठी ब्रेकिंग नुज म्हणजे तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर असे टाका ।।।how to make a business brand building videos in marathi/hindi ….
😀चला तर मित्रांनो लागा कामाला .फार काही नाही सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास बस बाकी वेळेत मजा करा ।।।स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्या . आणि सर्वांत महत्वाचे घरा बाहेर पडू नका नाही तर पोलिस खूप मारतात काठीने 😀😀
IMP – ब्लॉग आवडला तर ग्रुप वर किंवा मला व्हाट्स अप वर जरूर रिप्लाय द्या . आणि उद्योग व्यवसाय संबधी आणखी कुठला बाबी वर /विषयावर ब्लॉग हवा आहे ते पण कळवा.
🖋️🖋️ब्लॉग लेखन by – team UA