दे रे हरी आणि खा टल्या वरी अशी आपली एका मराठी म्हण आहे . कुठलीही गोष्ट हि तिचा पाठपुरावा केल्याशिवाय मिळत नाही .
प्रत्येक घटना कुठल्याही कारणामुळेच घडते प्रत्येक परिणामामागे काहीतरी कारण असतेच.त्यामागे
ऑरीस्टाटलने अत्यंत ठामपणे बजावून सांगितले होते की, हे जग कुणाच्या इच्छेप्रमाणे नाही, तर त्यामागे एक निश्चित नियमांची धारणा आहे.आपल्याला माहिती असेल किंवा नसेल; पण प्रत्येक घटना एका विशिष्ट कारणामुळेच घडते. त्यामागे काही ना काही कारणमीमांसा असणारच. ते नेमके काय हे कदाचित आपल्याला कळेल किंवा कळणारही नाही. त्यांने हेही सांगितले की प्रत्येक परिणाम जो घडलेल्या असतो,त्याला नक्की असे कारण किंवा क्रिया कारणीभूत असते. प्रत्येक घटनेचा किंवा ,क्रियेचा काही ना काही परिणाम झाल्याशिवाय राहत नाही, मग तो आपल्याला दिसो अथवा न दिसो आपल्याला आवडो अथवा न आवडो ,हा एक अगदी पुरातन काळपासून चालत आलेला नियम आहे. पश्चिमात्यांच्या तत्वज्ञानानूसार ही एक काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या कार्यकारणभाव शोधण्याच्या अविश्रांत क्षमांमुळेच पश्चिमात्यांनी शास्त्र, तत्रंज्ञान, औषधे,तत्वज्ञान आणि युध्दशास्त्र यामध्ये २००० वर्षापासून प्रगती केली. त्यामुळेच आज आपण जगामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने अत्यंत आश्चर्यकारकरीत्या उत्तम बदल घडवित आहोत.
आज घडत असलेले चमत्कार, यश, संपती सुखासीनता, भरभराट आणि व्यवसायातील यशाची पावती हे सर्व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्या कार्यकारणभावाच्या परिणामांचाच परिपाक आहे. ‘तो, जर तुमच्या उदिष्टांप्रती आणि त्यांच्या परिणामविषयी तुमच्या मनात कोणतीही शंका नसेल तर तुम्ही ते यशोशिखर निश्चितपणे सर करू शकाल, असा याचा अगदी स्पष्ट अर्थ आहे. इतरांनी आपल्यासारखीच असलेली त्यांची उदिष्टे कशी पूर्णत्वास नेली याचा अभ्यास करा, त्यांनी केले तसेच तुम्हीही करा आणि बघा तुम्हालाही तसेच फळ मिळल्याशिवाय राहणार नाही.
यश हा एक अपघात नाही
यश हा काही जादुई चिराग नाही की नशिबाचा फेरा नाही. कुठलीही गोष्ट वा घटना मग ती चांगली असो की वाईट, सकारात्मक असो की नकारात्मक काही एका कारणानेच घडते. त्या प्रत्येक घटनेला कार्यकारणभाव असतोच . तुमच्या आयुष्यात तुम्हाला नेमके काय हवे आहे हे जर तुम्हाला माहिती असेल, तर तेच मिळवताना इतरांनी जे काही केले आहे अगदी तसंच करा, तुम्हालाही तेच यश तेच उत्तर आपोआप मिळेल.
‘पेराल ते उगवले’ या वचनाप्रमाणेच हे आहे.सर आयझॅक न्यूटनच्या गतीविषयीच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे ते आहे. तो म्हणतो की, “प्रत्येक क्रियेला तेवढीच आणि तिच्या विरुध्द दिशेन प्रतिक्रिया घडते,,
हेच जरा वेगळ्या शब्दांत मांडूया . प्रत्येक विचार हा सर्जनशील किवा उत्पादनशील असतो. प्रत्येक विचारात काहीतरी निर्मितीमूल्य असतात . ती तुमच्या सर्जनशील जीवनाशी निगडीत असतात. तुमचे विश्व तुमच्या मनाप्रमाणे घडवू शकता तुमच्या जीवनातील व्यक्तीना आणि घटनांना तुमच्या कल्पनेनुसार तुम्ही सजवू शकता. आणि जेव्हा तुमचे विचार बदलतात, दुष्टी बदलते तेव्हा क्षनार्धात तुमच्या आयुष्यात बदल घडून येतात.
तुमच्या व्यावसायिक अथवा वैयक्तिक जीवनातील यशाचे गमक जे महारष्ट्रातील थोर विचारवंत सद्गुरू श्री वामराव पै यांनी सांगितले आहे ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!” तुम्ही स्वत: साठी जो विचार करता, जसा विचार करता तसेच तुम्ही घडत जाते .
तुमचे आयुष्य ही तुमची निवड आहे
तुमचे जीवन कसे घडवायचे, त्याला कसा आकार घायचा हे तुम्हीच ठरवू शकता. ते स्वातंत्र्य तुम्हालाच आहे. जीवनाच्या सारीपाटावर तुमच्या मनाविरुद्ध वागायला, विचार करायला आणि बघायला कुणीही जबरदस्ती करू शकत नाही .उलट तुमच्या भावना, तुमची एकून वागणूक, व्यवहार हा तुम्हीच निवडता. या जगाबाबत तुम्ही तुमचे मतही बनवता आणि तुमचे भवितव्यही तुम्हीच ठरवता.
तुमचे विचार आणि भावभावना सारख्या बदलत असतात . तुमच्या भोवतीच्या घटनामुळे त्यावर ताबडतोब परिणाम होत असतो. उदा.तुम्ही जर एखादी चांगली बातमी ऐकली की, तुम्हाला एकदम छान , उत्साहवधर्क वाटू लागते आणि प्रत्येक गोष्टीकडे आणि प्रत्येक माणसाकडे तुम्ही सकारात्मक दुर्ष्टीने पाहू लागला. तेच अचाकन एखादी वाईट बातमी कळली तर तुम्ही निराश होता, रागवता आणि भडकता, मग ती बातमी चुकीची आणि खोटी असली तरी तुमची प्रतिक्रिया तशीच होते. म्हणजेच तुम्ही ती घटना कशी ‘घेता’ यावर तुमची प्रतिक्रीया तशीच होते. म्हणजेच तुम्ही ती घटना कशी ‘घेता’ यावर तुमची प्रतिक्रिया अवलंबून असते.
हा नियम तुम्ही ताबडतोब अमलात कसा आणल?
१) तुमचे कुटुंब शरीरस्वास्थ्य , काम, तुमची आर्थिक परीस्थिती या तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या घटकाचा अभ्यास अभ्यास करा, त्यांच्याबाबत विचार करा. तुमच्या भावना, कुर्ती विचार आणि परिणाम याचा आणि वरील बाबीचा परस्परासंबंध, कार्यकारणभाव लक्षात घ्या. हे सर्व करताना अगदी प्रामाणिकपणे कुर्ती करा.
२) तुमच्या आताच्या जीवनपद्धतीनुसार , तुमच्या स्वत : संबंधीचा भावना काय आहेत ?तुम्ही स्वत: संबंधी काय आणि कसा विचार करता याचे अत्यंत बारकाईने पुथक्ककरण करा, त्याचा सूक्ष्म अभ्यास हे मना पासून करा. तुमचे विचार प्रयेक बाबीसंबंधात काय परिणाम घडतात कशी परिस्थिती निर्माण करतात आणि एकूनच तुमच्या आसपासची स्थिती कशी स्थिर ठेवतात यावर लक्ष ठेवा.तुमच्या जीवनातील काही काळामध्ये , चांगले बदल घडण्यासाठी तुमच्या विचारात काय आणि कसे बदल घडवणे आवश्यक आहेत, यावर विचार करा.
आपले विचार हेच यशाचे खरे गमक आहे . जसा विचार कराल तसे तुम्ही व्हाल . जाणीवपूर्वक विचारांना तुम्हाला जे काही मिळवायचे आहे त्याकडे वळवावे लागते . मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा जे काय मिळवायचे आहे त्याचा पाठपुरावा करावाच लागतो . नुसते दे रे हरी आणि मी काही ना करता रिकामा खाटल्यावरी बसतो याने काही होणार नाही.
टीम उद्योजक अकॅडमी .
आजच वेबसाईटवर जा आणि फ्री रेजिस्ट्रेशन करा .