स्पर्धात्मक युगात तुम्ही कोणता व्यवसाय करावा वा कोणते उत्पादन सुरू करावे :

स्पर्धात्मक युगात तुम्ही कोणता व्यवसाय करावा वा कोणते उत्पादन सुरू करावे :

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे .कोणत्याही व्यवसाय उद्योगात ही स्पर्धा आहेच .नवीन व्यवसाय सुरू करतांना खालील तीन गोष्टी चा अंदाज तुम्हाला करता आला तरच तुम्ही स्पर्धेमध्ये टिकू शकाल .त्या तीन गोष्टी खलील प्रमाणे .

  1. तुमच्या उत्पादनाला वा सेवेला बाजारपेठ आहे का ? 

सध्या मार्केटमध्ये जे उत्पादन व सेवा उपलब्ध आहे तीला टाळून ग्राहक तुमचे उत्पादन /सेवा घेणार आहे का .तुमचे उत्पादन उपलब्ध असलेल्या शी स्पर्धा करू शकेल का .असे काय नवीन गुणधर्म तुमच्या उत्पादनात आहे की ग्राहक तुमच्या कडे वळेल .

  1. ती बाजारपेठ पुरेशी मोठी आहे का ?

एकदा का तुम्हाला खात्री झाली की तुमच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध आहे तर पुढचा प्रश्न नक्की विचारा की ती बाजारपेठ पुरेशी मोठी आहे का .बऱ्याच वेळा तुमचे उत्पादन वा सेवा ही मौल्यवान असते ,चांगली असते ,लायक असते पण ते बाजारपेठत आणण्यासाठी आवश्यक वेळ व त्यात गुंतवावी लागणारी ऊर्जा आणि पैसा इतका जास्त असतो की त्या मानाने ती बाजारपेठेत इतकी मोठी नसते . प्रत्येक गुंतवणुकीची तुलना ही त्याच वेळेला उपलब्ध असलेल्या दुसऱ्या शक्य असलेल्या गुंतवणुकी सोबत केलीच पाहिजे . तुम्हाला पण तेच करायचे आहे .

3.बाजार पेठ प्रचंड अश्या भौगोलिक क्षेत्रात पसरली आहे का ? 

आता तिसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की सदर बाजारपेठ प्रचंड अश्या भौगोलिक क्षेत्रात पसरली आहे का. बाजारपेठ जर प्रचंड अश्या भौगोलिक क्षेत्रात पसरली असेल तर विक्री प्रक्रिया साबवण्यात अनेक अडचणी येतात व खर्च वाढतो . अनेक क्षेत्रात असल्याने प्रत्येकाचे प्रश्न वेगळे अडचणी वेगळ्या व त्यानुसार उत्पादनात बदल करावे लागतात .व त्यामुळे खर्चात वाढ होते व किंमत वाढते .

व्यवसाय सुरू करतांना वरील तीन प्रश्न स्वतःला विचारा आणि त्याचे उत्तरे शोधून मगच निर्णय घ्या .

Blog by – udyojak Academy

Leave a Comment