नियम नंबर 1
👉धन ,पैसा ,संपत्ती कोणी पण कमवू शकतो हे सर्व भेदभाव करत नाही
धन कधीच कुणासोबत भेदभाव करत नाही .तुमचा रंग काळा आहे की गोरा ,तुमचा जन्म कोणत्या जातीत धर्मात झाला, कुणाच्या पोटी झाला हे असे भेदभाव धन कधीच करत नाही . धन कमावण्यासाठी प्रत्येक दिवस हा वेगळा आसतो. धन हे बघत नाही की तुम्ही काल काय केले .आपल्या सर्वांकडे धन मिळविण्यासाठी चे सर्व अधिकार आहे जे इतरांकडे आहे . धन निर्जीव , निष्क्रिय आणि भावना विरहित असते .हे जग धनाचे भांडार आहे ,आपण ठरवायचे आहे त्या भांडरातून किती घायचे ,पण हे सर्व धनासंबधी तुमचा दृष्टीकोन काय आहे यावर अवलंबून आहे . प्रत्येक श्रीमंत व्यक्तीने एक पाऊल पुढे टाकत हे म्हणतो की हो धनाच्या भांडरातून मी पण धन घेऊ शकतो माझ्यात ती पात्रता आहे . यासाठी आपल्याला संकल्प आणि मेहनत करावी लागेल ..
माहिती संकलन – टीम उद्योजक अकॅडमी.