सप्तपदी गरुड व्यवस्थापनाची

    सप्तपदी गरुड व्यवस्थापनाची

पक्ष्यांचा राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गरुडाचे काही गुण खरेच आदर्श आहेत. त्याच्या जीवन पध्दतीच्या अभ्यास केल्यावर जाणवलेली ही व्यवस्थापन तत्वे. आपल्याला ‘गरुडभरारी, घेण्याससाठी ती निश्चितच उपयोगी पडतील.

  पल्या पारंपरिक  शिक्षण पध्दतीत  म्हणजे निसर्गातून विध्द्ता मिळवणे, असा शिक्षणाचा अर्थे होता. निसर्ग हा फार मोठा शिक्षक आहे. निसर्गातून शिकण्यासाठी फार प्रयत्न ही करावे लागत नाहीत . हवे असतात फक्त खुले डोळे आणि उदार ह्दय . मग अगदी मधमाशी पासूनही आपण स्थित्यंतराचे धडे  घेऊ शकतो. ती छोट्या छोट्या फुलांमधून मध घेते. एकाच फुलाचे जास्त शोषण करीत नाही. त्यामुळे फुलाची त्याबद्ल तक्रारही नसते, तर  पुंकेशर पसरविण्यासाठी तिने आपल्याला मदतच केली आहे, ही कुतज्ञताच असते. काहीही वाया न  घालवता ती या रसाचे औषधी मधात रुपांतर करीत मोठे मधाचे पोळे तयार करते . हा धडा घेऊन मानव आपल्या शोषणरहित, काहीही वाया न जाणाऱ्या आणि प्रदूषणविरहित कार्यपद्धती विकसित करू शकेल. गरुड हा पक्ष्यांचा राजा.त्याच्या जीवनपध्दतीची  अभ्यासातून जाणवलेली सात व्यवस्थापन तत्वे खाली दिलेली आहे. आजच्या व्यवस्थापकांना ती उपयुक्त वाटतील .

 योग्य संगत :

  अति उंचावर गरुड फक्त  एकटाच भ्रमण करीत असतो. तो छोट्या पक्ष्यांबरोबर कधीच उडत नाही. गरुडाइतक्या उंचीवर दुसरा कोणताही पक्षी पोहोचू शकत नाही. डोमकावळे  आणि चिमण्यांपासून तो दूरच राहतो.  गरुड फक्त  गरुडांबरोबर उडतो.

ध्येयावर दुर्ष्टी :

  गरुडाला  दूरदुष्टी  असते. तो पाच किलोमीटरच्या परिसरातील आपल्या भक्ष्यावर  नजर केद्रीत करू शकतो.  असे भक्ष्य शोधल्यावर तो आपले चित्त  एकाग्र करतो आणि ते मिळवण्याची मोहीम राबवतो. मग काहीही झाले,  कितीही  अडचणी आल्या तरी भक्ष्य मिळेपर्यंत तो त्याचा  प्रयत्न सोडीत  नाही.  भक्ष्य मिळाल्यानंतरच त्याची ही  मोहीम थांबते . आपले ध्येय ठरवा . त्यावर संपूर्ण लक्ष  केद्रिंत करा म्हणजे कितीही अडचणी आल्या तरीही आपण यश संपादन करणारच.

अघ्ययावत माहिती मिळवा

     गरुड मेलेले , शिळे भक्ष्य कधीच खात नाही, ते फक्त ताजेच मांस खातात. शिळ्या मासांवर गीधाडे ताव मारतात, गरुड नव्हे . आपण काय  बघायचे  आणि काय ऐकायचे, ते आपण काळजीपूर्वक ठरवा . विशेषत: दूरदर्शनवरील चित्रपट आणि इतर कार्यक्रम निवडतांना काळजी घ्या. जुन्या आणि शिळ्या माहितीकडे  दूर्लक्ष करा. नवीन शोधाची माहिती आपल्याजवळ असणे आवश्यक आहे.

आव्हाने स्वीकारा

  वादळाशी सामना करणे गरुडाला  आवडते . ढग जमल्यावर गरुड उतेजित होतात. वादळावरचाच उत्तम फायदा घेत गरुड आपल्या उड्डाणाची उंची वाढवीत जातात. वादळावर पकड मिळाल्यवर गरुड  स्वत: लाही ढगांच्या वर घेऊन जातात. त्यानंतर गरुडाला संथ उड्डाणाची संधी मिळते  आणि आपल्या पंखांना विश्रांती  देता येते. त्याला जीवनाचा आनंद घेता येतो . या वेळी मात्र इतर पक्षी झाडाझुडपांत खुश असतात व लपून बसतात . आयुष्यात येणाऱ्या संकटांचा ,अडीअडचणीचा उपयोग करून आपण अधिकाधिक उंची गाठू शकतो . यशस्वी माणसांना आव्हाने आवडतात आणि ते त्यांचा फायदा घेऊन जीवनातील आनदं उपभोगतात .  

सहकाऱ्यांचा विश्वास तपासा :

परस्पंरावर विश्वास टाकण्याच्या आगोदर गरुड  त्याची क्षमता  अजमावतात. जोडीदाराची  परीक्षा घेतात . गरुडाच्या  मादीला जेव्हा नर शोधायचा असतो  तेव्हा ती  नराची परीक्षा  घेते, ती जमिनीकेड झेपावले. नर तिचा पाठलाग करतो.जमिनीवरची एखादी फांदी  मादी घेते  आणि परत आकाशात  झेपावते. नर तिचा पाठलाग करतो. काही उंची गाठल्यावर  मादी ती फांदी सोडून देते . नर त्या फांदीचा  पाठलाग करतो . ती जमिनीवर पडण्यातआधीच पकडतो आणि मादीला परत करतो . मादी परत  आकाशात झेपावत, अधिक  उंच जाते आणि फांदी खाली टाकते.जमिनीवर   पडण्याआधीच   नर परत ती पकडतो. मादीला हवी असणारी उंची गाठेपर्यंत सतत हा खेळ तासनुतास चालतो. सतत अधिकधिक उंची गाठली जाते. एकमेंकांच्या कौशल्याबदल आणि वचन  बध्दतेबाबत खात्री पटल्यावरच ते एकत्र राहायचे ठरतात.

      वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यतही संभाव्य सहकाऱ्याची निवड करतांना त्याचे कौशल्य आणि वचनबद्धता  यांची चाचणी घेऊनच योग्य सहकाऱ्यांची निवड केली पाहिजे.

निर्मितीची योग्य जागा आणि प्रशिक्षण.

गरूडाच्या मादीची जेव्हा अंडी घालण्याची वेळ येते तेव्हा दोघेही कोणताही अडथळा येणार नाही , अशा सूरक्षित जागेचा शोध घेतात. नर जमिनीवरून काटेरी झुडपे गोळा करतो. कडयावरील एखादा चिरेत ती गोळा करतो,  जमवतो. त्यानंतर झाडांच्या काही फंद्याही आणल्या जातात. त्यावर मऊमऊ गवत पसरले जाते. अशी रचना झाल्यावर आत गरुडाची पिसे ठेवली जातात. आणि घरटे पूर्ण केले जाते . आजूबाजूच्या काट्यांमुळे इतर आक्रमणे टळतात. गरुडाचे कुटुंब वाढवण्यासाठी नर आणि मादी दोघेही कष्ट घेतात. यात त्यांचा सारखाच  सहभाग असतो. अंडी घालून पिले तयार होईपर्यत. त्याचे रक्षण करते. . नर घरटे बाधून आणि शिकार  करून कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी उचलतो.  पिलांना उडण्याचे प्रशिक्षण देताना  मादी पिलांना घराच्या बाहेर फेकते . घाबरून ते घरट्यात परततात तेव्हा ती घरट्यातील मऊ गवत काढून फेकून  देते.  काटे उघडे पडतात. घाबरलेली पिले जेव्हा घरट्याकडे परत येतात तेव्हा त्यांना काटे बोचतात. थरथरत रक्ताळलेल्या अवस्थेत ते घरट्याच्या बाहेर पडतात. त्यानंतर त्यांना कडयावर नेऊन आई खाली ढकलून देते. भीतीने थरथरनाऱ्या  आपल्या बाळांना आई  पुन्हा कड्यावर आणतात.  पिले स्वत :च्या पंखांवर फडफडेपर्यंत हा खेळही सुरूच राहतो . आपल्याला आता उडता  येते आहे , याचा शोध  लागल्यावर पिले आनंदी होतात.

   गरुडांचे हे घरटे तयार करणे , बदलासाठी पूर्वतयारी करण्याची शिकवणच  आपल्याला देत नाहीत का?  अंडे घालण्याआधी घरटे तयार करण्याच्या  प्रकियेपासून तर पिलांना उडणे शिकविण्याच्या प्रकीयेपर्यंत एकमेकांच्या सक्रीय  सहभागातून यश संपादन करता  येते. हा धडाच आपल्याला देतात ना? पिलांचे रक्तबंबाळ होणे त्रास घेतल्याशिवाय ,कष्ट केल्याशिवाय जीवनाचा आनंद उपयोगता येत नाही, कष्टशिवाय शिक्षण आणि प्रगती साधला येत नाही,  तर काटेकुटे घरांतून बाहेर पडून  संकटांच्या सामना करीत जीवन जगायला हवे, हेच धडे देतात.

विश्राती आणि नुतनीकरण

जेव्हा गरुड थकतो आणि त्यांचे पंख कमकुवत होतात तेव्हा पूर्वीसारखी भरारी मारणे त्यांना शक्य होत नाही.आपण थकलो आहोत आणि थोडे नूतनीकरण करायला हवे, याची जाणीव त्याला  होते. तेव्हा तो एखादा मोठ्या खडकाचा आधार घेतो. आपल्या अंगावरची सगळी पिसे तो खेचून काढतो. अंगावर  नवीन पिसे येईपर्यंत तो या एकांतवासातच राहतो. नवीन पंख आल्यावरच  तो आपल्या नेहमीच्या आयुष्यात परततो . आपल्यालाही  कधी कधी आपल्या जुन्या सवयीचा त्याग  करून  नवीन उत्साह मिळण्यासाठी असा एकांतवास जरुरीचा  असतो. आपले अनावश्यक ओझे कमी करायला  हवे असते . म्हणूनच आपण ठरवून तसा प्रयत्नही करायला  हवा.  ही  सप्तपदी आपण निष्ठेने चाललात,  तर यशाच्या ध्येयाने करायची आपली वाटचाल सुखकर होईल.

blog by : team udyojak academy.

Leave a Comment