⚖️कसे आहे तुमचे बॅलन्स शीट ( ताळेबंद) तुम्हाला माहित आहे का?
बॅलन्स शीट हा विषय फक्त व्यापार-उद्योग किंवा कॉमर्स चे विद्यार्थी यांच्याशी निगडित नसून हा विषय सर्वांशी निगडित आहे कारण प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी पैसा हा महत्त्वाचा असतो किंवा प्रॉपर्टी ही महत्त्वाची असते आणि म्हणूनच बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे कि बॅलन्स शीट ( ताळेबंद) चा आणि आपला काहीही संबंध नाही.
आज आपण समजून घेऊ की हे बॅलन्स शीट काय असते .ह्या ब्लॉगचा उद्देश हा ज्यांना बॅलन्स शीट किंवा ताळेबंद बद्दल काही माहीत नाही त्यांना अवगत करणे आहे.
👉 बॅलन्स शीट मध्ये दोन भाग असतात
- डाव्या बाजूला असतात तुमची देणे त्याला liabilities असे म्हणतात
- उजव्या बाजूला असते तुमच्या Assests किंवा येणे
अशा दोन भागात हे बॅलन्स शीट किंवा ज्याला आपण मराठीमध्ये ताळेबंद म्हणतो हा विभागलेला असतो
👉जी डावी बाजू आहे त्या डाव्या बाजूला असते पहिले भांडवल आता तुम्ही म्हणाल कि डावी बाजू हि देण्याची बाजू आहे तर भांडवल हे देणे कसं काय तर एखादा व्यापारी किंवा उद्योजक व्यवसायाचे पैसे टाकतो त्याला भांडवल असे म्हणतात आणि ते भांडवल हे व्यवसाय कडून त्याला घेणे असते म्हणून व्यवसायाचा ताळेबंद यामध्ये ते देणे साईडला दिसते.
नंतर दुसरी महत्वाची बाब ताळेबंद च्या देणे साईडला दिसते ते म्हणजे तुमचे लोन किंवा कर्ज ह्या कर्जामध्ये तुमचे मध्यम मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे जे काही कर्ज तुम्ही घेतलेले आहे ते कुठलेही असो ते इथे दिसतात. नंतर ह्या साईडला असते current liability ह्या मध्ये जे काही तुमचे इतर देणे आहे जसे की व्यापारी देणे, कुणाची उसनवार घेतलेले देणे, लाईट बिल भरायचं असेल त्याचे देणे, इत्यादी आणि जे काही किरकोळ देणे असतील ते ह्या मध्ये ते दिसतात. आता ही वरील जी झाली ती तुमच्या ताळेबंद डावी बाजू ज्याला आपण liabilities असं म्हणतो .
👉ताळेबंद उजवी बाजू म्हणजे Assets व येणे .
यामध्ये जे पहिल्यांदी दिसतात त्या म्हणजे तुमच्या फिक्स assets ज्याला आपण मालमत्ता असे म्हणतो याच्यामध्ये बिल्डिंग, मशिनरी, प्लॉट ,फ्लॅट ,शेतजमिनी असे दिसतात.
त्यानंतर दिसते ती म्हणजे गुंतवणूक तुम्ही जी काही गुंतवणूक केली आहे ही सर्व गुंतवणूक ताळेबंद त्याच्या उजव्या बाजूला गुंतवणूक या हेड खाली दिसते ह्यामध्ये तुमची बँक एफ डी, शेअर ,म्युचल फंड ,इन्शुरन्स व इतर जी काही गुंतवणूक केलेली आहे ही सर्व गुंतवणूक यामध्ये दिसते .
नंतर चे पुढचे हेड चे ताळेबंद च्या उजव्या बाजूला दिसते ते म्हणजे करंट assets यामध्ये तुमचे जे काही ही येणे, किरकोळ येणे बँकेतील शिल्लक या सर्व गोष्टी या मध्ये दिसतात दिसतात.
👉 आता प्रश्न असा येतो ज्यांचा व्यापार उद्योग व्यवसाय नाही त्यांनी आपले बॅलन्स शीट तयार करावे का ?तर त्याचे उत्तर होय असे आहे कारण बॅलन्स शीट किंवा ताळेबंद हा तुमचा आरसा आहे यामध्ये तुमचे येणे ,देणे , मालमत्ता ,गुंतवणूक हे दिसत असते .
साधारणता प्रत्येक वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्चला हे बॅलन्स शीट किंवा ताळेबंद तयार केला जातो परंतु जर तुम्हाला हा आरसा कायम मधून मधून बघायचा असेल तर प्रत्येकी तिमाहिला तुमचे बॅलन्स शीट किंवा ताळेबंद तयार करणे गरजेचे आहे म्हणजे नेमके आपण कुठे आहोत हे आपल्याला त्या आरशात दिसेल.
प्रत्येक तिमाहिला हे तयार केले तर आपल्याला आपल्या येण्याचा आणि देण्याचा अंदाज येतो आणि आपल्याला भविष्याचे नियोजन करताना याचा उपयोग होतो.
👉तुम्ही विद्यार्थी असा गृहिणी असा सीनियर सिटीजन असा किंवा नोकरदार असा प्रत्येकाकडे काही ना काही assets ही असते आणि काही ना काही देणे सुद्धा असते म्हणून प्रत्येकाने स्वतःची बॅलन्स शीट तयार करणे आवश्यक आहे कारण हा तुमचा आर्थिक आरसा आहे.
👉 साधा विद्यार्थी जरी म्हटला तरी त्याच्याकडे मोबाईल असतो त्याचे काही पुस्तके असतात त्याच्याकडे छोटा लॅपटॉप असतो हे झाले त्याची सर्व assets आणि हे जर त्याला पालकांनी घेऊन दिले असतील तर त्याच्या ताळेबंद च्या डाव्या बाजूला पालकांनी दिलेले भांडवल किंवा गिफ्ट असे दिसेल त्यामुळे त्याला ताळेबंद तयार करताना काही अडचण येणार नाही आणि तो स्वतःची ताळेबंद स्वतः तयार करू शकतो. फक्त यामध्ये ताळेबंद च्या डाव्या बाजूला काय येते आणि उजव्या बाजूला का येते हे नीट लक्षात घेणे गरजेचे आहे.
👉 ताळेबंद च्या दोन्ही साईड ह्या tally झाल्या पाहिजे . त्या tally होत नसेल तर आपल्याकडून काही तरी चुकत आहे किंवा काही तरी रक्कम लिहायची की बाकी आहे.
👉मग चला तर मित्रांनो एक वही घ्या आणि पेन घ्या दोन भाग करा डाव्या बाजूला भांडवल व देणी व उजव्या बाजूला मालमत्ता व येणी आणि स्वतःचे बॅलन्स शीट किंवा ताळेबंद तयार करायला घ्या आणि हे प्रत्येक तिमाहीला करा म्हणजे तुमचा आर्थिक आरसा तुम्हाला दिसेल त्याचे योग्य नियोजन तुम्हाला काढता येईल भविष्यात आपल्याला काय करायचे आहे हे समजेल. अर्थिक साक्षर प्रत्येकाने होणे गरजेचे आहे . कारण अर्थ हा जगण्यासाठी फार महत्वाचा विषय आहे .
📖🖋️ब्लाँग लेखन :
CA राम डावरे .
मोबाईल : 9049786333.