कॅच देम यंग
तरुणपणी त्यांना पकडा’ (catch them young) या वाक्याचे महत्व शिक्षण आणि प्राध्यापक जाणू शकतील. याच वयात आपण वरील तत्वज्ञानाचे महत्व त्यांना पटवून दिले, त्याच्या वापरासाठी त्यांना तयार केले तर त्याचा योग्य परिणाम आपण साधू शकू. क्वालिटी सर्कल, कायझेन आणि फाइव्ह एस. या तत्वज्ञानाची बीजे या वयातच पेरणे योग्य होईल . हे वयच आयुष्यासाठी उपयुक्त असे संस्कार रुजवण्यास योग्य आहे . ही तत्वज्ञाने इतर अनेक चांगल्या गोष्टीसारखीच व्यक्तीगत आणि सामजिक चारीत्याच एक भाग आहेत. तो एक महत्वाचा दुष्टीकोन आहे.
अतिशय ओघवते वक्तृत्त्व , जाज्वल्य देशाभिमान आणि बघताक्षणीच मूर्तीमंत प्रेरणा निर्माण करणारे प्रभावी व्यक्तीमत्व असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचे शिक्षणविषयीचे विचार अनंत काळापर्यंत आपल्याला मार्गदर्शक ठरतील .स्वामीजिंच्या मते, माणसात ‘मनुष्यत्व’ निर्माण करणे हेच शिक्षणाचे मुख्य कार्य आहे. माणसाच्या ठिकाणी जे पूर्णत्व अगोदरपासूनच आहे, त्याचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. आपल्या मेंदूत ठासून कोंबलेले माहितीचे भेंडाळे म्हणजे शिक्षण. नव्हे . आपल्याला आज आवश्यकता आहे जीवन सुसंघटीत करणाऱ्या, माणूस घडणाऱ्या , शील बनवणाया शिक्षणाची. असे शिक्षण ज्यामुळे माणूस सत्वशील बनेल, मानसिक शक्ती वाढेल ,बुध्दि चौफेरे आणि विशाल होईल. यामुळे माणूस आपल्या पायावर खंबीरपणे उभा राहू शकेल. आजच्या या माणसांच्या भाऊगर्दीत माणूसपण पारखे होत आहे, भावना बोथट होत आहेत . म्हणून आज आवश्यकता आहे ‘माणूस’ निर्माण करणाऱ्या शिक्षणाची. शिक्षणाचा खरा अर्थ आहे माणसाला विकसित करण्यात मदत करणे.
सध्या जगात नीतिमत्ता खालावत आहे. आतंकवाद फोफावतो आहे. भ्रष्टाचार बोकाळला आहे.
जगाच्या विविध भागांत दैनदिन जीवनात , रोजच्या व्यवहारात आणि कामात मानवता प्रतिस्थापित करण्यासाठी अनेक प्रयोग होत आहेत. असाच एक अभिनव प्रयोग जपानमध्ये झाला आहे. या प्रयोगामुळे जपानी लोकांनी आपल्या कारखान्यात आणि कामाच्या जागेत ज्ञान आणि मानवतेचा प्रभावीपणे उपयोग करून प्रगती साधली आणि काम करणाऱ्यांची नीतिमत्ता आणि मनोधैर्य वाढवले. याचे राष्ट्र म्हणून बहुमानही मिळवला. या रुपांतरासाठी त्यांनी क्वालिटी सर्कल, फाइव्ह एस आणि कायझेनसारख्या तंत्रांचा आणि कार्यपद्धतीचा वापर केला. उत्कुष्टतेकडे नेणारी संस्कृति , भावनिक जडणघडण , माणुसकी सहकार्य समन्वय, चारित्र्य घडवणे आणि सर्वांना महत्वाचे म्हणजे जीवनात शिस्त आणणे ही विघ्यालये आणि महाविद्यालय यांची प्रमुख उदिष्टे असायला हवीत असे जपानी लोकांचे मत आहे . जपानी माणसांनी माणूस घडण्यासाठी वापरलेल्या या प्रभावी तत्वज्ञानीची,उपयुक्त चळवळींची आपण थोडक्यात ओळख करून येऊ या.
क्वालिटी सर्कल : गुणवत मंडळ क्वालिटी
क्वालिटी सर्कल म्हणजे एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या सहा ते दहा व्यक्तींचा असा गट की जो स्वयंस्फूर्तीने एकत्र येतो. सार्वनुमते आपल्या समस्या निवडतो. शास्त्रशुध्द पद्धतीने त्या समस्यांसंबंधी माहिती गोळा करतो. व्यवस्थापनाच्या संमतीने कसोटीस उतरलेल्या तंत्राचा उपयोग करून या समस्या परत उदभवणार नाहीत, याची दक्षता घेत त्या उपाययोजना अमलात आणतो. क्वालिटी सर्कल हे लोकांना विधायक कार्यासाठी संघटीत करणारे तत्वज्ञान आहे. त्यामुळे यात भाग घेणाऱ्या लोकांना स्वयंस्फूती आणि समाधान मिळते. स्वत: ची आणि परस्परांची उन्नती साधता येते, काम करताना पोषक आणि व उत्साहवधर्क वातावरण निर्मिती होते . या चळवळीत कोणत्याही प्रकारची सक्ती किंवा आर्थिक फायदा नसतो. वैयक्तिक उन्नती, दुष्टीकोनात विधायक बदल सांघिक भावनेत वाढ,सहकार्य आणि कामात उत्कुष्टता साधणे ही या चळवळीची प्रमुख मुलभूत उदिष्टे आहेत.
कॅच देम यंग
बालवयातच मने कोवळी , ताजी आणि संस्कारक्षम असतात, तेव्हाच गुणवतेचे, सहकार्यचे धडे दिले तर ते सहजतेने ग्रहण करू शकतील. या मुलांमध्ये आपण गुणवत, सहकार्य आणि उत्कुष्टतेची बांधीलकी चांगल्याप्रकारे निर्माण करू शकतो. तेव्हा येथेच ‘तरुणपणी त्यांना पकडा, (chtch them young) या वाक्याचे महत्व शिक्षक आणि प्राध्यापक जाणू शकतील. याच वयात आपण वरील तत्वज्ञानाचे महत्व त्यांना पटवून दिले , त्याच्या वापरासाठी त्यांना तयार केले तर त्याचा योग्य परिणाम आपण साधू शकू. क्वालिटी सर्कल,कायझेन आणि फाइव्ह एस. या तत्वज्ञानाची बीजे या वयातच पेरणे योग्य होईल.
फाइव्ह एस कशासाठी
या सर्व सकल्पना म्हणजे नुसतीच तत्वज्ञानं नाहीत, तर विशिष्ट तत्वज्ञानबरोबर हे तत्वज्ञान दैनंदिन व्यवहारात कसे आणायचे, यासाठी लागणाऱ्या सहज आणि सोप्या कार्यपद्धती जोडही यांना दिलेली आहे. त्यामुळे त्यांचे रुपांतर सुरेख चळवळीत होते. या चळवळीत जरी जपानमधून आपल्याकडे आल्या असल्या तरी त्यामागील तत्वज्ञानाची बैठक भारतीय तत्वज्ञानाच्या अगदी जवळच्या आहेत. म्हणजे आपल्याला माहिती असलेले तत्वज्ञान परिणामकारकपणे कसे वापरायचे , व्यवहारात कसे उतरवायचे , हेच फ्क्त आपल्याला शिकायचे आहे.
या सर्व संकल्पनांमागील सर्वांत महत्वाचे तत्व म्हणजे माणसांना कार्यप्रेरित करून एकत्र बांधने आणि नीतिमान माणसें तयार करणे.
कायझेन : सतत सुधारणा जपानने सर्व जगापुढे जे स्पर्धात्मक आव्हान निर्माण केले आहे, उत्पादकता आणि गुणवत्ता या क्षेत्रात आव्दितीय कामगिरी केली आहे. त्याचे सारे क्षेय त्यांच्या ‘कायझेन’ या कार्यपद्धतीला जाते. कायझेन म्हणजे सुधारणा , सतत सुधरणा मग ती वैयक्तिक क्षेत्रात असो, सामाजिक आयुष्यात असो किंवा औघोगिक अथवा व्यावसायिक क्षेत्रातील असो . या प्रतेक ठिकाणी अगदी प्रतेक व्यक्तीच्या सहभागाने अविरत सुधरणा व्हायला हव्यात.
कायझेन म्हणजे शून्य गुतंवणूक. नुसत्या सूचना नाही प्रत्यक्ष केलेला बदल कोणतीही विशेष गुंतवणूक न करता खर्च, न करता बदल अमलात आणणे. शून्य गुंतवणूक, शून्य खर्च, दोष शून्य देखभाल आणि शून्य चुका कोणतीही गोष्ट आहे तशी न स्वीकारता ती अशीच का ? याचा विचार करून सुधारण्याच्या दुष्टीने त्यात बदल करणे . जगातील आजच्या सर्वोत्तम गोष्टीतही सुधरणा करता येणे शक्य . यावर विश्वास. निंरतर सुधारणा.
फाइव्ह एस स्वच्छता , नीटनेटकेपणाची पाच तंत्रे
जपानमध्ये क्वालिटी सर्कल, कायझेन अशा चळवळीत जोमाने का बहरल्या, या शोधाचे उत्तम त्यांनी केलेल्या प्रत्येक सुधरणा, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा निर्माण करणाऱ्या आणि टिकविणाऱ्या ‘फाइव्ह एस’ या कार्यप्रणालीलाच घ्यावे लागले. ही पाच तंत्रे जपानने अतिशय आत्मीयतेने आणि सैनिकी शिस्तीने अमलात आणल्या . या यशाचे मुख्य कारण असे की, कोणतेही. सुधरणा अमलात आणताना काही तरी प्रमाणीकरण असायला हवे . या बाबतीत विशीष्ट पातळी गाठलेली हवी . जपानमध्ये जन्मलेली ही पाच साधी, सोपी: पण अत्यंत प्रभावी तंत्रेही पातळी तयार करण्याचे काम करतात. त्यामुळेच सतत सुधारणांमध्ये सातत्य ठेवता येते. या तंत्राच्या वापरामुळे आपल्या कामाची जागा स्वच्छ,टापटीप व्यवस्थित सुबक आणि धुळविरहित राहते. गुणवतेच्या प्रवासातील मार्गाचा हा भक्कम पायाच आहे. यामुळे उत्तम कामासाठी उत्तम वातावरण तयार होते स्वयंशिस्त वाढते. लोकांचे नितीधैर्य उतम राहून वृती समाधानी होते. जपानी लोकांचे मला जाणवलेले एक वैशिष्ट्ये म्हणजे आपल्याला वरवर वाटणाऱ्या सामान्यज्ञान चे रुपांतर ते सहज अमलात आणता येतील, अशा कार्यपद्धती करतात आणि नंतर याचे रुपांतर एका सुंदर कार्य संस्कुतीत होते. ही पाच तंत्रे म्हणजे व्यवस्थीतपणा, नीटनेटकेपणा, धूळ आणि घाणरहित पवित्र जागा, प्रमाणीकरण आणि स्वंयशिस्त होय.
या सर्व संकल्पना म्हणजे नुसतीच तत्वज्ञानं नाहीत, तर विशीष्ट तत्वज्ञानबरोबर हे तत्वज्ञान दैनंदिन व्यवहारात कसे आणायचे, यासाठी लागणाऱ्या सहज आणि सोप्या कार्यपद्धतीची जोडही यांना दिलेली आहे. त्यामुळे त्यांचे रुपांतर सुरेख चळवळीत होते . या चववळी जरी जपानमधून आपल्याकडे आल्या असल्या तरी त्यामागील तत्वज्ञानाची बैठक भारतीय तत्वज्ञानच्या अगदी जवळच्या आहेत. म्हणजे आपल्याला माहिती असलेले तत्वज्ञान परिणामकारकपणे कसे वापरायचे , व्यवहारात कसे उतरावयाचे , हेच फत्त आपल्याला शिकायचे आहे.
या सर्व संकल्पनांमागील सर्वांत महत्वाचे तत्व म्हणजे माणसांना कार्यप्रेरित करून एकत्र बंधाने आणि नीतिमान माणसं तयार करणे. उच्च दर्जाचे उत्पादन किंवा सेवा निर्माण करण्याआधी उच्च दर्जाच्या माणसांची निर्मिती करयला नको का? हेच काम तर शाळा, विघालये आणि महाविद्यालयतून प्रभावीपणे व्हायला हवे.
आज देशाचा विकास हा मोठ्या प्रमाणात उधोगांच्या उत्तम कामगिरीवरच अवलंबून आहे. आपल्या उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील माणसांचा विचार केला, तर या क्षेत्रात अर्थपूर्ण सहभाग घेणाऱ्या माणसाचे वय सर्वसाधारण ३० ते४० असे असते. या वयात त्यांच्या दुष्टीकोनाला अपेक्षित आकार घ्यायचे काम सुरु होते बराच उशीर झालेला असतो. त्यामुळे अपेक्षित घ्येय गाठणे अवघड जाते. या वयात माणसांची मनेही घट्ट झालेली असतात. त्यावर संस्कारांचा, नितीमातेच्या ठसा उमटवण तितकसं सोप नसत बदल घडण्यासाठी त्यांची मने संस्कारक्षम नसतात. या वयातील संस्कार सिमेटसारखे घट्ट झालेले असतात.त्याचे रुपांतर दृढ विश्वास आणि अशी मने होऊ घातलेल्या बदलास विरोध करतात, त्याविरुध्द बंड करून उठतात. त्याऐवजी जर बालववयात जेव्हा मने कोवळी, ताजी आणि संस्कारक्षम असतात,तेव्हाच गुणवतेचे,सहकार्यचे धडे दिले तर ते सहजतेने ग्रहण करू शकतील. या मुलामध्ये आपण गुणवत,सहकार्य आणि उत्कुष्टतेची बांधीलकी चांगल्याप्रकारे निर्माण करू शकतो. तेव्हा येथेच ‘तरून पणी त्यांना पकडा’ (catch them young) या वाक्याचे महत्व शिक्षण आणि प्राध्यापक जाणू शकतील.याच वयात आपण वरील तत्वज्ञानचे महत्व त्यांना पटवून दिले याच्या वापरासाठी त्यांना तयार केले त्याचा योग्य परिणाम आपण साधू शकू. क्वालिटी सर्कल कायझेन आणि फाइव्ह एस . या तत्वज्ञानाची बीजे या वयातच पेरणे योग्य होईल. हे वयच आयुष्यासाठी उपयुक्त असे संस्कार रुजवण्यास योग्य आहे . ही तत्वज्ञान इतर अनेक चांगल्या गोष्टीसारखीच व्यक्तिगत आणि सामाजिक चारित्र्याचाच एक भाग आहेत . तो एक महत्वाचा दुष्टीकोन आहे.
विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांचा विकास शिक्षकांच्या हाती आहे. जीवन कसे जगावे, हे विज्ञान शिकवत नाही, विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याची जबाबदारी शिक्षकाचीच असते. चांगला नेता लोकसभेत घडत नाहीतर तो शाळेत, विद्यालयातच घडत असतो. जगात सर्वांत पवित्र व्यवसाय हा शिक्षकाचाच आहे असे मानले जाते. विद्यार्थ्यांवर शिक्षकाच्या व्यक्तीमत्वाचा प्रचंड प्रभाव पडत असतो. ते विद्यार्थ्यां चे ‘रोल मॉडेल’ च असतात. या आधुनिक कार्यपद्धतीत योग्य बदल करून शिक्षणक्षेत्रात त्याचा वापर केला तर त्या खूप उपयोगी होतील , असे प्रकर्षाने वाटते.
Blog by : Team Udyojak Academy
mail id : info@udyojakacademy.com
1 thought on “कॅच देम यंग”