सुंदर आयुष्याचे इंद्रधनुष्य
आनंदी राहायला कुणाला आडवत नाही ? वास्तविक आनंद ही मनाची एक अवस्था आहे आनंदि राहायचे की दु: खी व्हायचे यापैकी एकाची आपण निवड करू शकतो. त्यासाठी काही बाबी लक्षात घ्यायला हव्यात. आनंद हा संस्कारजन्य आहे कारण आनंदी माणूस त्याच्या अवतीभवती आनंदच पसरतव असतो . त्यामुळे एक आनंदी माणूस अनेकांना आनंदी बनवू शकतो.
आयुष्यातील सर्वच गोष्टी किवा घटना आपल्या मनासारख्याच घडत नाहीत आणि हवे तसे घडले नाही की आपल्याला दु :ख होणारच त्यामुळे काही कठीण प्रसंगांचा सामना आपल्याला करावा लागतोच. तरीही आयुष्यातील प्रत्येक घटनेकडे., प्रसंगाकडे सकारात्मक दुष्टीकोनातून पाहायला हवे : कारण आपल्याला सहन कराव्या लागलेल्या प्रसंगापेक्षा कितीतरी पटींनी अवगड किवा दु खाचे प्रसंग इतर लोकांना सहन करावे लागतात. .अशा लोकांची संख्या कोट्यवधी आहे. त्यामुळे नियंत्रनातील गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा.
मनात आकस नको
अनेक माणसे आपल्या मनात आकस किवा अढी धुरून बसतात. त्यामुळे ते आनंदाला मुकतात. शाळेतील मित्र, कार्यलयातील सहकारी वा व्यावसायीक भागीदार वा कुटूंबातील एखादि व्यक्ती मनात त्यांच्याबदल कटुता न ठेवता पुढे जायला हवे. आपल्याला आलेल्या कटू अनुभवाचे आकारण भांडवल करून अनेक लोक दु: खी होतात. आकस ही एक नकारात्मक उर्जा आहे. काहीही केले तरी घडून गेलेली गोष्ट आपण मागे नेऊ शकत नाही किवा पुसून टाकू शकत नाही . न आवडलेल्या गोष्टी मनातून पुसून टाकत पुढे जायला हवे .
प्रेम कारायला शिका :
आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रतेक योग्य व्यक्तीवर माया आणि प्रेम करायला शिका. त्याचे मुक्त कंठाणे कौतुक करावे. आपली मैत्री आणि प्रामाणिक पणा त्यांना जाणवतोच. बहुसंख्य माणसांकडून याला तसाच प्रतिसाद मिळेल. संधीची अनेक दारे त्यामुळे खुली होतील. काम आणि मैत्रीतून समाधान लाभेल आणि आनंदसुध्दा होईल.
कामातील आनंद घ्यावा
आपण आपल्या सक्रीय आयुष्यातील बराच मोठा काळ कामाच्या ठिकाणीच घालवत असतो. तेव्हा आपण जे काम करतो ते आनंददायी व्हायला हवे. प्रत्येकाला आपल्या आवडीचे काम मिळेलच असे नाही: परंतू आपल्या वाट्याला आलेल्या कामात आनंद निर्माण करता येतो. आपण आपल्या कामातून आनंद घेतला नाही. तर जीवनातल्या इतर आनंदालाही आपण मुकतो . सध्या आपण करत असलेल्या कामात आपल्याला आनंद वाटत नसेल, तर आपल्याला आवडीचे काम शोधण्याचा प्रयत्न करा. परंतु ते मिळेपर्यंत आहे त्या कामाबद्दल कुरकुर न करता त्यातच आनंद शोधा. असे केले नाही तर एका दृष्टचक्रात आपण अडकतो.
आरोग्यसंपन्न राहावे–
आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी असणे हा आनंदाचा मुलभूत पाया आहे. निरोगी शरीरातुनच निरोगी मनाची निर्मिती होत असते. आपले शरीर आरोग्यसंपन्न राहिल याची काळजी घ्यावी. उत्तम आणि आरोग्यवर्धक आहार घ्यावा. नियमित व्यायामही करावा. असे केल्यास आपल्यातील उर्जेचा स्त्रोत अखंडित राहील. आजार आणि रोग आपल्यापासून दूर राहतील.
इंद्रधनुष्य काय सांगते?
Ø काहीही केले तरी घडून गेलेली गोष्ट आपण मागे नेऊ शकत नाही किंवा पुसून टाकू शकत नाही. न आवडलेल्या गोष्टी मनातून पुसून टाकत पुढे जायला हवे.
Ø आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक योग्य व्यक्तीवर माया आणि प्रेम करायला शिका.
Ø प्रत्येकाला आपल्या आवडीचे काम मिळेलच असे नाही; परंतु आपल्या वाटयाला आलेल्या कामात आनंद निर्माण करता येते. आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी असणे आनंदाचा मुलभूत पाया आहे.
Ø आपल्याला ज्यात अधिक आनंद वाटतो, जीवन जगण्याचे सार्थक वाटते, अशा बाबी अग्रक्रमाने करा.
Ø उत्तम नियोजन केल्यास आपण जास्त साध्य करू शकतो आणि त्याचा आनंदही जास्त मिळतो.
Ø दुसऱ्यांबरोबर कधीही आपली तुलना करू नका; कारण त्याच्या आयुष्याच्या प्रवासाची आपल्याला कल्पना नाही.
मनापासून छंदांना महत्व द्या–
आयुष्यात आपल्याला जे करावेसे वाटते ते सर्वच आपण करू शकतो असे नाही; पण यातील काही बाबी आपण नक्कीच करू शकतो. त्यासाठी जरूर वेळ काढावा. आपल्याला ज्यात अधिक आनंद वाटतो, जीवन जगण्याचे सार्थक वाटते, अशा बाबी अग्रक्रमाने करा- मग ते एखाद्या खेळात सहभागी होणे असो, गाणे वा तबला वाजविणे असो- आपल्याला ते करावेसे वाटते तेच महत्वाचे आहे.
आयुष्याचे नियोजन करा–
करण्यासाठी अनेक गोष्टी असतात; पण उपलब्ध साधनसामुग्री, संधी आणि कार्यक्षमता यामुळे सर्वच गोष्टी आपण करू शकत नाही. त्यामुळे कामात नियोजन आवश्यक असते. असे नियोजन करणारी माणसे जास्त सुखी आणि समाधानी असतात, हा अनुभव आहे. उत्तम नियोजन केल्यास आपण जास्त साध्य करू शकतो आणि त्याचा आनंदही जास्त मिळतो. उपलब्ध वेळेचा चांगला उपयोग करता येतो.
त्याशिवाय पुढील काही गोष्टींचाही अंगीकार उपयोगी ठरेल–
Ø जागेपणी अधिक स्वप्ने पाहा.
Ø सकाळीच दिवसभराचे नियोजन करावे.
Ø भरपूर हसावे . त्यामुळे अखंड उर्जा मिळत राहते.
Ø आयुष्य ही शाळा आहे असे समजून सतत शिकत राहावे.
Ø दिवसातून १० मिनिटे तरी स्वस्थ बसण्याचा सराव करावा.
Ø दररोज कमीत कमी तिघांना तरी हसवण्याचा प्रयत्न करावा.
Ø समस्यांना घाबरू नये: त्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहेत.
Ø आयुष्य लहान आहे ,त्यामुळे तीरस्कारात वेळ घालविणे पडणारे नाही.
Ø भूतकाळ शांतपणाने स्वीकारावा : म्हणजे तो आपल्या वर्तमानात गुंता उभा करणार नाही.
Ø लहान मुले व वृद्ध यांच्या बरोबर वेळ घावावावा .
Ø प्रत्येक वाद आपण जींकलाच पहिजे असे नाही. मतभेद आहेत हे मान्य करा आणि स्वीकार.
Ø दुसऱ्यांबरोबर कधीही आपली तुलना करू नका: कारण त्याच्या आयुष्याच्या प्रवासाची आपल्याला कल्पना नाही
थोडक्यात सागांयचे तर आनंद हा फुलपाखरांखा असतो. त्याचा जास्त पाठलाग केला तर तो तुमच्यापासून दूरच जातो:परंतू आपण त्याच्या वरचे लक्ष हटवून दुसरीकडे लक्ष केंद्रित केले, तर फुलपाखरू जसे अलगद येऊन आपल्याला खांद्यावर बसते, तसाच आनंदही अलगद आपल्याजवळ येतो. त्यामुळे आनंदाच्या मागे कधी धाऊ नये.
Blog by : Team Udyojak Academy.
Mail id : info@udyojakacademy.com