*मोटीव्हेशनल व्हिडीओ* पाहुन व्यवसाय सुरु करायचा नसतो.
मोटीव्हेशनल व्हिडीओ पाहुन व्यवसाय सुरु करायचा फक्त विचार करायचा असतो.
व्यवसाय सुरु करण्यासाठी आधी व्यवसायाची माहिती करुन घ्यावी लागते, मार्केटचा अंदाज घ्यावा लागतो, शक्यता आणि संधीचा विचार करावा लागतो, चांगल्या वाईट परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते.
नोकरी काय करता व्यवसाय करा, पैसा फक्त व्यवसायातच मिळतो, नोकरी म्हणजे तुरुंग, आपल्या स्वप्नांसाठी व्यवसाय करा, असले डायलाॅग ऐकुन बरेचजण नोकरी सोडुन व्यवसाय सुरु करतात आणि प्रत्यक्ष व्यवसायात पडल्यानंतर कळतं की हे क्षेत्र वाटत तेवढं सोपं नाही. पहीले वर्षभर तर काहीच मिळत नाही, व्हिडीओत पाहुन ठरवलेल्या अपेक्षेप्रमाणे तर नाहीच नाही. मग सतत नोकरीतल्या पगाराशी तुलना केली जाते. त्या व्हिडीओत तर पॅलेस, सुपरकार, हेलीकाॅप्टर दाखवलं होता, पण ईथं तर भलतच काही चालू असल्याचं लक्षात येतं. त्यात कामाचा ताण नोकरीपेक्षा जास्तच असतो. नोकरीत मालक सांगेल तेवढं काम करायचं आणि महीन्याकाठी पगार घ्यायचा अशी सवय लागलेली असते. ईथे मात्र सगळंच स्वतःला संभाळावं लागतं. मग पुन्हा नोकरीच बरी असा विचार डोक्यात यायला लागतो. असा विचार सुरु झाला की आपल्याच व्यवसायाचा तिरस्कार करणं सुरु होतं. आणि लवकरच व्यवसाय बंद पडायची वेळ येते.
व्यवसाय फक्त पैसा नाही. पैसा नोकरीतसुद्धा मिळतो. व्यवसाय हे पॅशन आहे. किंवा अपघाताने समेर आलेली संधी आहे. पण ठरवुन या क्षेत्रात येताना या क्षेत्राविषयी आवडच असावी लागते, नाहीतर निभाव लागणार नाही. ईथे येताना सर्व परिणामांची तयारी ठेवावी लागते. ईथे श्रीमंतीला मर्यादा नाही हे निश्तिच, पण पैशासाठी या क्षेत्रात येणार असाल तर अवघड आहे. कारण जेवढा पैसा अपेक्षीत असतो तेवढा पहील्या दिवसापासुन मिळत नसतो. जे अपघाताने या क्षेत्रात येऊन यशस्वी झालेत त्यांनीसुद्धा एखाद्या उत्पन्नाची अपेक्षा ठेऊन व्यवसायात पाऊल ठेवलेलं नसतं.
मोटीव्हेशनल व्हिडीओ पाहुन, लेक्चर ऐकुन या क्षेत्रात येऊ नका. मोटीव्हेशनल व्हिडीओ पाहुन व्यवसायात येणे म्हणजे हातात थंड पाण्याची एक बाॅटल आहे म्हणुन थेट वाळवंट पार करायचं ठरवण्यासारखं आहे. पण एका बाॅटलच्या भरवश्यार अख्ख वाळवंट पार होऊ शकत नाही. त्यासाठी त्या वाळवंटात राहण्याची कलाच शिकुन घ्यावी लागते. तिथल्या उन्हाची आणि थंडीची, गरम पाण्याची, कोरड्या हवेची, वादळाची तयारी ठेवावी लागते. कधीमधी एखादं ओअॅसीस भेटलं तर तेवढाच विरंगुळा होईल, पण पुन्हा पुढचा प्रवास सुरु होईल. काही काळानंतर ईथे परिस्थितीला सरावताल, मग हळूहळू प्रवास पुर्ण होत जाईल, आणि मग कुठे जाऊन समुद्र समोर दिसायला लागेल…
व्यवसाय साक्षर व्हा…
🙏🙏🙏🙏🙏