तुमचा व्यवसाय आणि उत्तरदायित्व
तुमच्या व्यवसायातील सर्व गोष्टी किवा घटनांसाठी तसेच तुम्ही जे काही बनू इच्छीता किवा प्राप्त करू इच्छीता त्यासाठीही तुम्ही जबाबदार असता
तुम्ही तुमच्यासंबंधी जसा विचार करता तसेच बहुदा तुम्ही बनत जाता. तुम्ही कोणता आणि कसा विचार करता हे फक्त तुम्हीच ठरवू शकता . सर्वसाधारणपणे वयाच्या अठराव्या वर्षी किवा कधी कधी त्या आधीही तुमची निवड तुम्हीच करू लागला किंवा निर्णयही घेऊ लागला त्या निवडीला आणि निर्णयांना मग तुम्हीच जबाबदार ठरता . तुम्ही जे काही आहात, जिथे कुठे आहात ते केवळ तुमच्यामुळेच आहात दुसरे कोणी याला जबाबदार नाही .तुमच्या आवडीने तुम्ही काम निवडले आहे आणि तुम्हीच ठरवल्यानुसार तुम्ही कमवत आहात तुमची निवड ठरवायला तुम्ही स्वतत्र आहात पण एकदा का ते निवडून झाले किवा नाहीच झाले, तरी जे काही त्याचे परीणाम होणार आहेत, ते तुम्ही सर्वस्वी मान्य केलेच पाहिजेत, हे तुम्हाला मान्य असलेच पाहिजे.
वैयक्तिक जबाबदारीची जाणीव ही वैयक्तिक जीवनातील आणि सर्वजनिक जीवनातील एक फार महत्वाची किंबहुना सर्वात महत्वाची बाब आहे. यात दोन विचारधारा आहेत काही जणांचे म्हणणे आहे की कुठल्याही गोष्टीसाठी कुणी एक व्यक्ती जबाबदार असत नाही जे काही दुदैर्वाने घडते मग ते कुणालाही कुठेही घडो त्यासाठी सरकार , समाज किवा उद्योगधंदे यांनाच दोष दिला पाहिजे असा त्याचा अगदी ठाम विश्वास असतो.
या वैयक्तिक स्वातंत्र असलेल्या समजात वैयक्तिक जबाबदारी हीच महत्वाची आहे अशी दुसरी विचारधारा आहे ती आवश्यक आणि अटळ आहे स्वत: च्या वागणुकीबदल , ती व्यक्ती स्वत च त्याच्या परिणामसाठी उत्तरदायी असते जी गोष्ट व्यक्ती करेल किवा करण्याकडे दुर्लक्ष करेल त्या सर्वासाठी ती व्यक्तीच पूर्णपणे जबाबदार असेल.
जबाबदारी घेणे ही गोष्ट पूर्णत: आपसूक आणि आनंददायी असते . त्याला पर्याय नाही. ती गोष्ट अनिवार्य आहे जेवढी जास्त जबाबदारी तुम्ही स्वीकाराल तेवढ्या जास्त प्रमाणात तुमची उतरोतर प्रगती होत राहणार आहे . तुमच्यासाठी दुसरे कोणीही आताही काही करत नाहीच आणि भविष्यातही करणार नाही .
जबाबदारी स्वीकार करण्यातली गमतीची किवा कुतूहलाची गोष्ट ही आहे जेवढी जास्त जबाबदारी तुम्ही घ्याल, तेवढे तुम्ही स्वत कडे जास्त लक्ष देऊ शकाल आणि तेवढी जास्त मदत लोकही तुम्हाला करू पाहतील . पण तेच तुम्ही जर कमी जबाबदारी स्वीकारलीत आणि इतरांना जास्त दोष देत राहिलात तर फारच कमी लोकांना तुमच्यासाठी काही करावेसे वाटेल .
जीवनात तुम्ही आता जे आहात , जिथे कुठे आहात, हे तुमच्या आजवरच्या कर्माचे फळ आहे , तुमची तीच निवड आहे तुमचे कर्तृत्व आणि वागणूक याचे ते फलित आहे. तुम्हाला ते आवडो अगर नावडो, तो तुमच्या निर्णय होता.
तुम्हाला निवडीचे स्वातत्र्य आहे .तुम्हाला हवे ते तुम्ही करू शकता त्यासंबंधी बोलू शकला: परतू तुमच्या कृत्याची अथवा ते कृत्य असफल झाल्यास ते टाळल्याची जबाबदारी तसेच जे बोलायचे होते ते न बोलण्याचे होते ते न बोलण्याची जबाबदारी तुम्ही कधीही टाळू शकत नाही.
तुमच्या पूर्ण जागृत मनाने जो निर्णय घेतला आहे, तेव्हापासूनच तुमची जबाबदारी सुरु होते
तुम्ही त्याबाबत काय विचार करता आणि कसा विचार करता, त्यावरून तुमच्या सच्चेपणा दिसून येतो .त्यावर पूर्ण नियंत्रण फ्क्त तुम्हीच मिळवू शकता त्यामुळे त्यावर ताबा मिळवून जे उदिष्ट साध्य करायचे आहे त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे ( जे नको आहे ते सर्वंस्वी टाळून) ही तुमची स्वत: वर स्वमित्व मिळण्याची नियत्रण मिळण्याची आणि आत्मबळ वाढण्याची सुरुवात आहे.
तुमच्या सुटकेसाठी , मदतीसाठी कोणीही येणार नाहीत.
तुमची जबाबदारी ही सर्वस्वी तुमची आहे, दुसऱ्या कोणाचीही नाही. तुमच्या जीवनाची उन्नती होण्यासाठी तुमची स्वत ची उन्नती होणे आवश्यक आहे. परिस्थिती बदलावी असे वाटत असेल तर प्रथम तुमच्यात बदल घडवा. काही गोष्टीत सुधरणा करायची गरज असेल तर प्रथम तुम्ही स्वत ला सुधारा स्वत: त योग्य ते बदल घडवा.
आपल्या कृत्याची पूर्ण जबाबदारी घेण्यामुळे सगळ्यात उतम मोबदला मिळतो तो म्हणजे स्वत
वर मिळवलेल्या विजयाचे स्वामित्व आणि मुक्ती याचा परिणामकारक अनुभव, पूर्ण जबाबदारी स्वीकारल्यामुळे तुम्हाला अत्यंत सकारात्मक आणि आनंदीपणाची जाणीव होते . अकस्माततेच्या नियमापासून तुमची पूर्ण सुटका होते तुमच्या यशाचा उमदा घोडा प्रगतीपथावर चौफेर धावायला लागतो. तुमच्या क्षमता पूर्ण फुलून येतात तुमच्या उदिष्टाचा पुर्ततेत तुम्ही वेगाने प्रवास करू लागला , जी तुमचा दुष्टीने खूप महत्वाची असतात.
उद्योजकाने व्यवसायात जबाबदारी कशी स्वीकारायची ;
१) तुमच्या कामातील प्रत्येक बाबीसाठी तुम्ही पूर्ण जबाबदारी घ्या. प्रत्येक उधोगामधील वरिष्ठ लोक,ती जागा ते पद त्याच्या स्वत:च्याच उधोगातील असल्याप्रमाणे आपुलकीने व्यवहार करीत असतात . तो उद्योग त्याच्या मालकीचा आहे अशा पद्धतीने ते तिथे काम करतात , मग पगार कोन देतोय हे त्यांना महत्वाचे नसते त्यामुळेच त्या कपंनीत त्यांचे काम नेहमीच आदर्शवत ठरते आणि सर्वजण त्यांना खूप मानही देतात.
कधीही कुरकुर करू नका किवा कुठल्याही गोष्टीसाठी कधीही दुसऱ्याला दोष देऊ नका . हे माझे काम नाही असे कधीही म्हणू नका आणि तसा विचार मनातही आणू नका . हे असे म्हणण्याचे काम आहे त्याचे ज्यांना भविष्याच विचार नाही . हे तुमचे काम नाही . तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात.
२) कुठेलेही काम करायला आपणहून पुढे या, मग ते नवे असो की अतिरिक्त एखादां नव्या कृतीची कल्पना बैठकीत मांडली गेली असेल तर सर्व प्रथम तुमचा हात वर येऊ घ्या ते करण्यासाठी आपणहून पुढाकार घ्या. पुढील घटनेचा आधीच वेध घ्या. आपणहून आपल्या वरिष्ठकडे जा. मग तो वरिष्ठ स्त्री असो की पुरुष आणि त्यांना सागा की तुम्ही नवे तसेच अतिरिक्त काम मागयला आला आहात , आणखी जबाबदारी घ्यायला आला आहात .
देण्यात आलेले नवीन किवा अधिकचे काम उत्कष्ट आणि जलद गतीने करा. कुठेलेही काम त्वरित करण्याची सवयच स्वत ला लावून घ्या. मिळालेल्या प्रत्येक संधीचे उत्कष्ट कामगिरीत रूपांतर करा .
ब्लॉग लेखन : टीम उद्योजक अकॅडमी